पुण्यातील कोट्यवधींची जमीन, 100 कोटींचं साम्राज्य, आरोपी मोटेगावकरच्या मालमत्तेने तपास यंत्रणांनाही धक्का

मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या संपत्तीबाबत उघड झालेल्या नव्या माहितीनंतर तपास यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे.

Untitled Design 84 1

Untitled Design 84 1

Motegaonkar has properties worth crores in Pune : देशभर गाजलेल्या NEET पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात अधिक खोलवर जात असल्याचे चित्र समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या संपत्तीबाबत उघड झालेल्या नव्या माहितीनंतर तपास यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे. सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कोठडीत असलेल्या मोटेगावकरने पुण्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले असून, या व्यवहारांमागील पैशाचा स्रोत काय? याचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकरने 2023 मध्ये पुण्यातील वारजे परिसरात तब्बल 51 गुंठे जमीन खरेदी केली होती. शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जमिनीची सध्याची बाजारातील किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. लातूर आणि इतर भागांत क्लासेस चालवणाऱ्या एका शिक्षकाकडे एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी पैसा आला कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मी सदस्य नाही, पण सन्माननीय कॉकरोच आहे’; CJP आंदोलनाला सोनम वांगचुकांचा जाहीर पाठिंबा, सरकारला दिला महत्त्वाचा सल्ला

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, मोटेगावकरकडे 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. NEET परीक्षेतील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांकडून घेतलेली मोठी रक्कम आणि पेपर फुटीच्या माध्यमातून उभारलेले कथित आर्थिक जाळे यामधूनच हे साम्राज्य उभे राहिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भावनांशी खेळ करत कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोपही तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

दरम्यान, NEET पेपर फुटी प्रकरणात यापूर्वीच काही धक्कादायक कनेक्शन समोर आले आहेत. मनीषा हवालदार तसेच NTA मधील काही अधिकाऱ्यांशी संबंधित धागेदोरे तपासात पुढे आले असून, आता मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांवरही CBI ने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याची बँक खाती, मालमत्तेचे व्यवहार, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे केवळ पेपर फुटीपुरतेच नव्हे तर त्यामागे उभ्या असलेल्या कथित आर्थिक साम्राज्याचेही नवे पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version