Bajrang Sonawane : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार फोडत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. तर आता उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. यातच राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ऑपरेशन तुतारीची चर्चा जोराने सुरु झाली आहे.
खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडणार असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात ऑपरेशन तुतारी ची चर्चा सुरु असताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे. आमचे आणि समाजवार्दी पार्टीचा एकही खासदार फुटणार नाही असा दावा रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, खासदार फोडण्यासाठी टार्गेट करण्यात येत आहे. परंतु आमचे आणि समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार नाही. डेलीमिटेशनसाठी भाजपला आणखी 41 खासदारांची गरज आहे परंतु असे काही होणार नाही. खासदार बजरंग सोनवणे यांनी मुलावर होत असलेल्या आरोपांमुळे फडणवीस यांची भेट घेतली असेल. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि केंद्रातलं गृहमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे आहे त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल असं माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले.
ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोण
ऑपरेशन टायगर अतर्गत परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशीवचे खासदार ओम निंबाळकर, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ -वाशिमचे खासदार संजय देशमूख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
गूढ नजरा आणि अनुत्तरित प्रश्न…, ‘बोल बोल राणी’चा थरार 17 जुलैला उलगडणार
