Nilesh Lanke Sleeps On Ground In Zilla Parishad School : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. लंके थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. निलेश लंके आमदार असताना कार्यकर्ते आमदार निवासात बेडवर झोपलेले होते अन् आमदार लंके (Nilesh Lanke) खाली अंथरूणावर झोपले होते, असे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे. नाशिकमधील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा प्रकार (Maharashtra Politics) घडला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम
शनिवारी रात्री खासदार निलेश लंके यांनी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपला मुक्काम केला. यावेळी ते जमिनीवर अंथरुण टाकून आपल्या कार्यकर्त्यांसह झोपले. खासदार लंके एका खास मोहिमेसाठी रामशेज किल्ल्यावर आले आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. त्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेल्या रामशेज किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, संवर्धन आणि वृक्षारोपण उपक्रम आज राबवले जाणार आहेत.
माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान; अजित पवार अन् चंद्रराव तावरेंमध्ये फाईट
साधेपणाचा प्रत्यय
विशेष म्हणजे या मोहिमेसाठी खासदार लंके येणार होते, याअनुषांगाने त्यांच्या स्वागताची शनिवारी सायंकाळी जोरदार तयारी करण्यात आली होती. रामगृहावर त्यांच्यासाठी कक्ष देखील राखीव ठेवण्यात आला होता. परंतु, खासदार लंके आणि खासदार भास्कर भगरे यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणाचा प्रत्यय दिला आहे. त्यांनी चक्क किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी (दिंडोरी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत मुक्काम केलाय. त्यांच्या या मुक्कामामुळे परिसरामध्ये वास्तव्याला आलेल्या मावळ्यांचा देखील हुरूप वाढला.
मोठी बातमी! विषारी इंजेक्शन टोचून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांची आत्महत्या
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न
खासदार लंके यांच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील खासदार भास्कर भगरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे. हे सर्व नेते स्वयंसेवकांसह आज किल्ल्यावर आपली मोहीम राबवणार असल्याचं कळतंय.गेल्या काही महिन्यांपासून खासदार लंके यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत.