MPSC Candidates Received Calls Offering Paper For 40 Lakh : परीक्षेपूर्वीच MPSC प्रिलिम्सच्या प्रश्नपत्रिकांचा काळाबाजार (MPSC Exam) होत असल्याचं समोर आलंय. फक्त 40 लाख भरा आणि सरकारी नोकरी मिळवा, ‘रोहन कन्सल्टन्सी, नागपूर’ च्या नावाने व्हॉट्सअॅप बैठका घेऊन कॉल केले जात आहेत. मूळ कागदपत्रांची मागणी (MPSC) देखील केली जात आहे. हा फक्त फोन घोटाळा आहे की, त्यामागे आणखी एक मोठं रॅकेट आहे? कष्टाळू विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या टोळीवर कारवाई केली जाईल का, असा प्रश्न देखील समोर येत आहे.
आर्मी हेलिकॉप्टरला धडकलेल्या अमेरिकन एअरलाइन्समधील सर्व 64 जणांचा मृत्यू ? 28 मृतदेह सापडले
यासंबंधी एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोनमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने 40 लाख रूपयांची मागणी केलीय. 40 लाख रूपये द्या, तुम्हाला आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका देतो, असं या फोनमध्ये सांगितलं जातंय. यामुळे आता एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत. यावर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Lokseva Aayog) सचिवांची प्रतिक्रिया समोर आलीय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं उत्तर
येत्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
धस, सोळंकेंना धक्का, प्रशासनाला दम… अजितदादांनी कसं लावलं ‘बीड’चं नियोजन?
डॉ. खरात म्हणाल्या की, 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी. महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी 2 लाख 86 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ. खरात यांनी यावेळी सांगितले.