MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कमाल वयोमर्यादेत एक वर्ष वाढ, लाखो तरुणांना दिलासा
MPSC Student Age Limit: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra State Public Service Commission) परीक्षार्थींसाठीची वयोमर्यादा वाढविण्याची गेल्या दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, आता राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचा जीआर आज जारी करण्यात आला असून लाखो उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला.
तुम्ही फडणवीसांच्या टीमचे कॅप्टन, असं म्हणताच उदयनराजे म्हणाले ‘नाही रे बाबा…’अन् पिकला एकच हशा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शासकीय निर्णयाची प्रत आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केली. त्यात म्हटलं की, 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम-2024, 26 फेब्रवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, असं या जीआरमध्ये म्हटलं.
एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आपले महायुती सरकार!
कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच… pic.twitter.com/1k4f153F0i
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2024
बावनकुळेंना रामटेक बंगला, कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक, वाचा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला?
सदर अधिनियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदांची संख्या आणि आरक्षण नमूद करून मागणीपत्रे सुधारितकरण्याची कार्यवाही आवश्यक आहे. याकरता सुधारित मागणी पत्रानुसार, जाहिराती प्रसिध्द करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2024 च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणता जाहिरात प्रसिद्ध करण्यास सुमारे 9 ते 10 महिन्यांचा विलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासकीय सेवेतील प्रवेशाकरताची विहित केलेली निर्धारित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. त्यानुसार सरकारने कमाल वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
कोणाला मिळणार लाभ…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 01 जानेवारी 2024 ते या शासन निर्णयाच्या तारखेपर्यंत पदभरतीसाठी ज्या जाहिराती नव्याने प्रकाशित करण्यात आल्यात. आणि त्या जाहिरातीलच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली.
जीआरमध्ये पुढं म्हटलं की, ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन 25 एप्रिल 2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर एका वर्ष सवलत दिली जाईल.