बावनकुळेंना रामटेक बंगला, कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक, वाचा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला?

  • Written By: Published:
बावनकुळेंना रामटेक बंगला, कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक, वाचा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला?

Chandrashekhar Bawankule :  महायुती सरकारचा (Mahayuti) शपथविधी सोहळा आणि खातेवाटप मार्गी लागल्यांतर नव्या मंत्र्यांना दालनं आणि बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील बंगले नेमून देण्यात आली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना रामटेक बंगला (Ramtek Bungalow) देण्यात आला आहे.

भुजबळांसाठी अजितदादांचा मास्टर प्लॅन ; फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी 

खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यातआला. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याच्या चाव्या मिळाल्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ यांना विशाळगड, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवासदन, गुलाबराव पाटील यांना जेतवन, दादा भुसे यांना जंजिरा, संजय राठोड यांना शिवनेरी, धनंजय मुंडे यांना सातपुडा, उदय सामंत यांना मुक्तागिरी, पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला मिळाला.

सिनेसृष्टीवर शोककळा! श्याम बेनेगल यांचे निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…. 

दरम्यान, बावनकुळे यांना मिळालेल्या रामटेक बंगल्याची कहाणी खूप मोठी रंजक आहे. या बंगल्यात राहणारे मंत्री वाद-विवादात अडकतात, असा इतिहास आहे. त्यामुळं महसूलसारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळालेल्या बावनकुळे यांच्या कारकिर्दीत अडचण निर्माण होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मलबार हिल परिसरात असलेला रामटेक बंगला मोठा आणि प्रशस्त आहे. कधीकाळी या बंगल्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा असायची. मात्र 2000 सालानंतर या बंगल्यात राहणाऱ्या मंत्र्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्याचा इतिहास आहे.

भुजबळ आणि खडसेंना राजीनामा द्यावा लागला…
1999 मध्ये सेना-भाजप युती सरकारने राज्यातील सत्ता गमावली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आलं, तेव्हा हा बंगला छगन भुजबळ यांना देण्यात आला. त्यावेळी तेलगी प्रकरण गाजलं होतं. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळांचे नाव पुढे आले होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी भुजबळांना चांगलेच सामोरे जावे लागले होते.

युती सरकारच्या काळात कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी रामटेक बंगला मिळाला होता. मात्र त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

कुणाला कुठला बंगला मिळाला? पाहा यादी…

राहुल नार्वेकर – शिवगिरी

राम शिंदे – ज्ञानेश्वरी

चंद्रशेखर बावनकुळे- रामटेक

राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन

पंकजा मुंडे- पर्णकुटी

शंभूराज देसाई-मेघदूत

गणेश नाईक-पवनगड

धनंजय मुंडे-सातपुडा

चंद्रकांत पाटील-सिंहगड

गिरीश महाजन-सेवासदन

मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग

अशोक उईके-लोहगड

आशिष शेलार-रत्नशिषु
दत्तात्रय भरणे- सिद्धगड

अदिती तटकरे-प्रतापगड

शिवेंद्रराजे भोसले- पन्हाळगड

माणिकराव कोकाटे-अंबार

जयकुमार गोरे-प्रचितीगड

नरहरी झिरवाळ-सुरुची

संजय सावकारे-अंबर 32

संजय शिरसाठ-अंबर 38

प्रताप सरनाईक-अर्वतो 5

भरत गोगावले-सुरुची 2
मकरंद पाटील-सुरुची 3
गुलाबराव पाटील-जेतवण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube