Download App

मोठी बातमी : विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे MPSC नमलं; परीक्षा पुढे ढकलली; मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम

सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी  दिला होता.

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्यसेवा आणि आयबीपीएस या परीक्षांची तारीख एकाच दिवशी आल्याने ही तारीख बदलावी यासाठी विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन (MPSE Studet Protest) सुरू करण्यात आलं होतं. आता या आंदोलनाला अखेर यश आले असून, MPSC तर्फे 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (MPSC Examination Postponed After Student Protest)

…तर मोठं आंदोलन केले जाईल रोहित पवारांचा इशारा 

25 तारखेची परीक्षा पुढे ढकलली मात्र ऑक्टोबर पर्यंत या परीक्षेची तारीख यावी, असे मत आंदोलनामध्ये सहभागी झालेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. सोबतच कम्बाईन परीक्षेचे नोटिफिकेशन देखील आगामी नऊ ते दहा दिवसांमध्ये यावं अशी मागणी तसेच नोटिफिकेशन आले नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

मोठी बातमी : जरांगेकडून भाजपला सुरूंग! बड्या नेत्याने बीडमधून जरांगेंकडे मागितली उमेदवारी

परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थी आंदोलनावर ठाम

एकीकडे 25 ऑगस्ट रोजी होणारी MPSC ची परीक्षा जरी पुढे ढकलण्यात आली असली त्यानंतरदेखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी जाहीर केलं आहे.

Chourang Punishment : हात-पाय कलम अन् जखमा तेलात तळायच्या; शिवरायांच्या काळातल्या शिक्षेबद्दल माहितीये का?

 शरद पवारांनी दिले होते आंदोलनात उतरण्याचा इशार 

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु, सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी  दिला होता.

फडणवीसांनी मानेल आभार

25 ऑगस्ट रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत आभार मानले आहेत. काल (दि.21) एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी असल्याचे फडणवीसांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us