नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

  • Written By: Published:
नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाले असून आज (ता.13 जानेवारी) सकाळपासूनच चौकात ठाण म्हणून बसले आहेत.

आयोगाकडून परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल हा 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलं आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

आयोगाने नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही. गेल्या काही वर्षापासून आम्ही याच पद्धतीने अभ्यास करतोय यामुळे 2025 पर्यंत तरी मागील पद्धतीने एमपीएससीचा अभ्यासक्रम त्याच पद्धतीने ठेवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी पुण्यातील एमपीएससी करणारे विद्यार्थी आज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांची ही मागणी आयोग मान्य करणार का? आणि त्यात बदल होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube