Download App

मुंबईत जोरदार पाऊस; रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, ‘Mlc’ मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी फेटाळली

आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.

  • Written By: Last Updated:

Mumbai Rain : आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. (Mumbai Rain ) तीन दिवसांपूर्वी पावसामुळेच मुंबईची तुंबई झाली होती. सामान्य नागरिकांसह अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री, आमदारांना अडकून पडावं लागलं होतं. आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. (MLc) यामधअये दादर, परळ, भायखळा भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसंच वडाळा, सायन, दादर टिटीमध्ये पाऊस सुरु झाला असून पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

गाड्या उशिराने विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्वांनाच मताच्या वजाबाकीची चिंता, बेरजेच्या गणितात कोण बाजी मारणार?

कालपासून रिमझिम पडणारा पाऊस आज मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. मध्य रेल्वेवर पावसाचा परिणाम झाला आहे. लोकल पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत. दरम्यान, आज विधान परिषदेची निवडणूक होत असून या पावसाचा आमदारांनाही सामना करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून निवडणुकीचा वेळ एक तासाने वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

मागणी फेटाळली लेक एकपट आई पाचपट; मनोरमा खेडकरने बळकावली जमीन, पिस्तूल काढून शेतकऱ्यांना भरला दम

दुसरीकडे किंग सर्कल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किंग सर्कल भागात पाणीच पाणी झाले असून दादरकडून चेंबूरकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणंही झालं कठीण. दरम्यान, विधान परिषदेच्या मतदानासाठी आमदारांना वेळ वाढवून द्या अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु, ती मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे.

 

follow us