Ajit Pawar On Shinde Fadnavis Sarkar : मुंबईमधील (Mumbai)बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)वज्रमूठ सभेतून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निषाणा साधला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसावरुनही सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्याचबरोबर दहा महिने झाले आहेत, सरकार निवडणुका घ्यायला का घाबरतंय? सरकार निवडणुका का घेत नाही? भिती कशाची वाटतेय? महानगपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सरकार का घेत नाही? का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाही? आतातर पावसाळा पण नाही. परंतु यांच्या मनात निव्वळ भिती आहे की, निवडणुका जाहीर झाल्यावर जनता काय करेल, याच्याबद्दला विश्नास शिंदे-फडणवीस सरकारला नाही, अशी घणाघाती टीका अजित पवार यांनी केली आहे.
Nana Patole : बाजार समित्यांच्या निवडणुकीतून जनतेने जागा दाखवून दिली
महाविकास आघाडीच्या कार्याकाळात आर्थिक शिस्त आम्ही कुठेही मोडली नाही. कालच माझ्या वाचनात आलं की, 31 मार्चची 1 लाख 8 हजार कोटींची बिलं या शिंदे-फडणवीस सरकारनं द्यायची थांबवलेलं आहे. आज चेक वठले जात नाहीत. कॉन्ट्रॅक्टरला सांगिलं की, थोडसं थांबा. हे कशामुळं घडलं. कोण याला जबाबदार आहे? असा सवालही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.
आम्ही सर्वसामान्याचं सरकार, आम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, का तुम्ही याला जबाबदार नाही का? आज महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय, शेतकरी अडचणीत आहे. त्याच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याची उन्हाळी पिकं वाया गेली आहेत. परंतु त्याला मदत करण्याची भूमिका आत्ताच्या राज्यकर्त्यांची नाही, शिंदे-फडणवीस काय करतात? त्यांचं काम नाही का? परंतु त्यांना बाकीच्या कामामध्ये जास्त रस आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
काल परवा मुंबईमध्ये काय घडलं? बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोयता गँग. कुठली कोयता गँग, कसकाय त्यांच्यामध्ये मस्तवालपणा आला आहे? याला जबाबदार कोण? सरकारचं काम नाही का? पोलीस यंत्रणेला आदेश देता येत नाही का? सर्वसामान्यांनी कोणाला संरक्षण मागायचं? असा सवालही यावेळी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.