Nana Patole : बाजार समित्यांच्या निवडणुकीतून जनतेने जागा दाखवून दिली

Nana Patole : बाजार समित्यांच्या निवडणुकीतून जनतेने जागा दाखवून दिली

Nana Patole On BJP : कला परवा राज्यात बाजार समित्यांच्या निवडणूक झाल्या. भाजप ही शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, ते गरिबांच्या विरोधातील आहे, ते मध्यम वर्गीयांच्या विरोधात आहे. हे निकालातून राज्याच्या जनतेंनी दाखून दिले आहे. सत्ता असून देखील निकाल यांच्या विरोधात गेले. हाच महाविकास आघाडीचा विजय आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा काय आहे हे दाखवून दिली. असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यावेळी म्हणाले ते मुबईतील वज्रमूठ सभेत जनतेला संभोधित करत होते.

महाराष्ट्रामध्ये ही वज्रमुठची तिसरी सभा जेव्हा वज्रमूठ सभा होते तेव्हा विरोधकांना भीती निर्माण होते की आमचं काळ – पिवळं या वज्रमूठ सभेच्या माध्यमातून या राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर येईल. आणि आमचा लोक विरोध करतील आणि आम्ही सतेच्या बाहेरजाऊ अशी भीती सत्तेत बसलेल्या आणि सत्तेची मलाई खाणाऱ्यांना वाटत आहे.

मुंबईवर राग असलेली लोकं दिल्लीत; आव्हाडांचा केंद्रावर घणाघात

महाराष्ट्रातील नगरपालिका, महापालीका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या असतील या जनतेच्या विकासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेला या सरकारने ब्लॉक करून ठेवलं आहे. येथे सरकारने लोकप्रतिनिधी ना ठेवता प्रशासक आणून ठेवले आहेत ते जनतेचे प्रश्न न सोडवता फक्त मनमानी कारभार करत आहेत. संविधानिक प्रक्रियेला संपवण्याची प्रक्रिया हे सरकार करत आहे. उद्या निवडणुका झाल्या की निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल त्यामुळे हे खोके सरकार घाबरून निवडणुका देखील घेत नसल्याची टीका यावेळी नाना पाटोळेंनी राज्यातील सरकारवर केली.

खारघर घटनेचा विचार केला तर उन्हामध्ये तडफडून लोकांना मारले. एक प्रकारचा सामूहिक हत्याकांड अमित शहा आणि राज्यातील सरकारने केला असा घणाघात नानांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube