Maharashtra Rain Update : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा फारसा (Maharashtra Rain) जोर दिसला नाही. आता मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Heavy Rain) व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार पावसाचे प्रमाण वाढणार आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. नगर शहरात रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस झाला.
Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाच्या (Weather Update) ताज्या अंदाजानुसार 26 सप्टेंबरपासून पुढील 10 ते 12 दिवस मध्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. 26 ते 3 ऑक्टोबर या काळात दक्षिण कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर जास्त राहिल अशी शक्यता आहे. तसेच 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहिल असा अंदाज आहे. तर 10 ते 17 ऑक्टोबर या काळात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वारे 17 सप्टेंबरपासून माघारी फिरत आहेत. 23 सप्टेंबरपर्यंत त्यांचा प्रवास सुरू करतील अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. नवरात्री उत्सव लवकरच सुरू होणार आहे. या काळात पावसाची उपस्थिती असेल अशी शक्यता दिसत आहे.
राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज, कुठं होणार पाऊस?
शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका
राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळासह पाऊस (Heavy Rain) होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार आहे.