Download App

चांद सुलताना हायस्कूलच्या चेअरमन पदी एकमताने मुशाहिद शेख यांची निवड

Chand Sultana High School : नगर शहरातील चांद सुलताना हायस्कूलच्या (Chand Sultana High School) चेअरमनपदी आज एकमताने मुशाहिद

  • Written By: Last Updated:

Chand Sultana High School : नगर शहरातील चांद सुलताना हायस्कूलच्या (Chand Sultana High School) चेअरमनपदी आज एकमताने मुशाहिद लियाकत शेख (Mushahid Liaqat Sheikh) यांची निवड करण्याती आली आहे. मुशाहिद शेख यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याने या निवडीचे पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच मुशाहिद शेख यांच्या नेतृत्वाखाली चांद सुलताना हायस्कूलला एक नवीन दिशा आणि एक नवीन ओळख मिळणार असा विश्वास पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकमताने शाळेच्या चेअरमन पदावर निवड झाल्याने मुशाहिद शेख यांचा शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी बोलताना मुशाहिद शेख यांनी शाळेच्या शैक्षणिक व प्रशाकीय उन्नतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वसन दिले आहे. तसेच शाळेत वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीव विकासासाठी नवे- नवे उपक्रम राबवण्यात येणार असल्यचाी ग्वाही देखील मुशाहिद शेख यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.

खासगी शाळेत मध्यवर्गीयांची लुटमार, चार्टर्ड अकाउंटंट मीनल गोयलांचा धक्कादायक दावा

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी यांच्यासह समाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us