Download App

Nana Patole : दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होणार; नाना पटोलेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

Nana Patole on CM Shinde : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या एका जाहिरातीवरून राजकारणात खळबळ माजली होती. कारण या जाहिरातीमध्ये एका सर्व्हेचा दाखल देत राज्यात भाजपच्या फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री शिंदेंना लोकांची जास्त पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शिंदेंकडून पून्हा दुसरी जाहिरात देत त्यावर सारवासारव देखील करण्यात आली. मात्र त्यावरून अद्याप देखील विरोधकांकडून या प्रकरणी त्यांच्यावर टीका होत आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होणार असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं आहे. (Nana Patole Critisize CM Shinde on politicle survey)

जाणून घ्या मोदींनी जो बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तुंची खासियत…

नाना पटोले हे कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होणार असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने ज्या सर्व्हेवरून पहिली जाहिरात छापली होती. त्यामध्ये दाढीवाले बाबा पुढे होते. त्यानंतर भाजपमध्ये या जाहिरातीवरून चलबिचल सुरू झाली.

अधिकाऱ्यांना तंबी देण्याची मंत्री विखे पाटलांवर आली वेळ; वाळू विक्री केंद्रावर नक्की काय झालं?

त्यानंतर आठ दिवसांत पुन्हा सर्व्हे आला. त्यामध्ये आमचे नागपूरचे पुन्हा येईनवाले होते. मग दाढीवाल्या बाबांचे मागच्या सर्व्हेत जे 50 होते. ते 15 निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आता दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होणार हे ठरलेलं आहे. हे या जाहिरातवरून स्पष्ट होत आहे. असा नाना पटोलेंनी शिंदेंना नाव न घेता टोला लागावला आहे.

काय होती ही जाहिरात?

शिवसेनेने राज्यामध्ये एक सर्व्हे केला असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविण्यात आली. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 % जनतेने कौल दिल्याचं समोर आले. यानंतर मात्र, आता भाजपच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर आल्या.

Tags

follow us