जाणून घ्या मोदींनी जो बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तुंची खासियत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते आज ते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी अगोदर बायडेन दाम्पत्याने मोदींना तर नंतर मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तुंची सध्या चर्चा सुरू आहे. काय आहेत या भेटवस्तू आणि त्या मागील अर्थ जाणून घेऊ…
मोदींनी या भेटवस्तुंमध्ये दिलेलं चंदन हे कर्नाटकमधील म्हैसूर चंदनाचा तुकडा आहे.
चांदीचा दिवा कोलकात्याच्या कारागिरांनी तो बनवला आहे.
भगवान गणेशाची मूर्ती कोलकात्याच्या सोनारांच्या पाचव्या पिढीने बनवली आहे.
24 कॅरेट सोन्याचं नाण हे राजस्थानातील कारागिरांनी हाताने बनवलेलं आहे.
या भेटवस्तुंतील तूप हे पंजाबमधील आहे.
गूळ हा महाराष्ट्रातील आहे.
तांदूळ हे उत्तराखंडमधील आहेत.
मीठ हे गुजरातमधील आहे.
तर तीळ हे तामिळनाडूचे आहेत.
