Nana Patole on Ajit Pawar : ‘अजित पवारांना माझी कॅपॅबिलीटी कळाली. ते माझे कौतुक करत आहेत. याबाबत मी त्यांचे धन्यवाद करतो. कारण त्यांनी एक वर्ष कॉंग्रेसचा अध्यक्ष का होऊ दिला नाही. त्यांची चुक त्यांनी मान्य केली. तसेच तत्कालीन उपाध्यक्षांनी त्या 16 आमदारांना अपात्र का केल नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावे. जनतेचे प्रश्न कॉंग्रेससाठी महत्वाचे आहेत.’ अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांवर केली आहे.
अजित पवारांनी नाना पटोलेंवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नाही तर तेव्हाच शिंदेंच्या 16 आमदारांना अपात्र केलं असतं असा आरोप केला होता. त्यावरून आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांवर केली आहे.
…तर 16 आमदारांना तेव्हाच अपात्र केलं असतं, अजित पवारांचं नाना पटोलेंकडे बोट
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी गुरूवारी राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालायाने दिलेल्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. तर यावेळी त्यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यावर देखील आपलं मत व्यक्त केलं. पवार म्हणाले की, आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. हा निकाल पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल हा माझा अंदाज होताच. पण पक्षांतर्गत बंदी कायद्याला काही अर्थ राहणार आहे का? नाही हा प्रश्न निर्माण झाला.
दरम्यान नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना नविचारता दिला. तो राजीनामा त्यांनी द्यायला नको होता. तसेच त्यावेळीच अध्यक्षांची नेमणूक लवकर करायला हवी होती. अनेक काळ उपाध्यक्ष काम पाहत होते. जर ती पोस्ट भरली गेली असती तर या 16 आमदारांना त्यांनीच अपात्र केला असतं. असं म्हणत अजित पवारांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे या आमदार अपात्रतेवरून बोट दाखलवलं.