Maharashtra Political Crises : …तर 16 आमदारांना तेव्हाच अपात्र केलं असतं, अजित पवारांचं नाना पटोलेंकडे बोट

Maharashtra Political Crises : …तर 16 आमदारांना तेव्हाच अपात्र केलं असतं, अजित पवारांचं नाना पटोलेंकडे बोट

Ajit Pawar On Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरूवारी राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालायाने दिलेल्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. तर यावेळी त्यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यावर देखील आपलं मत व्यक्त केलं. पवार म्हणाले की, आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा. हा निकाल पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल हा माझा अंदाज होताच. पण पक्षांतर्गत बंदी कायद्याला काही अर्थ राहणार आहे का? नाही हा प्रश्न निर्माण झाला.

Video : ‘उद्धव ठाकरेंकडे रडल्या असता तर जास्त योग्य ठरलं असतं’; अजितदादांनी अंधारेंना झापलं

दरम्यान नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना नविचारता दिला. तो राजीनामा त्यांनी द्यायला नको होता. तसेच त्यावेळीच अध्यक्षांची नेमणूक लवकर करायला हवी होती. अनेक काळ उपाध्यक्ष काम पाहत होते. जर ती पोस्ट भरली गेली असती तर या 16 आमदारांना त्यांनीच अपात्र केला असतं. असं म्हणत अजित पवारांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे या आमदार अपात्रतेवरून बोट दाखलवलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube