Suhas Kande : राज्यातील आज 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून नांदगाव नगरपालिकेत आमदास सुहास कांदे यांनी बाजी मारली असून माजी खासदार समीर भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे. नांदगाव नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहे. या निवडणुकीत भाजपला एकही जागा राखता आलेली नाही. नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर हिरे विजयी झाले आहे. त्यामुळे नांदगाव नगरपालिकेत माजी खासदार समीर भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांनी सहकारी पक्षांना बरोबर घेत पॅनल उभे केले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील पॅनल उभे करत आमदार सुहास कांदे यांना टक्कर देण्याचे प्रयत्न केले होते मात्र नांदगाव नगरपालिकेत आमदास सुहास कांदे यांनी बाजी मारली असून सर्व नगरसेवक विजयी झाले आहे.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रशांत बंब यांना गंगापूरमधून धक्का बसला आहे. गंगापूरमधून आमदार सतीश चव्हाण यांनी बाजी मारली आहे.
Nagarparishad Election Result Live : आज 288 नगरपरिषद- नगरपंचायतीचा निकाल; मतमोजणीला सुरुवात
