Download App

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याने अध्यक्षपद? नरेंद्र जाधवांनी मोठा खुलासा करत सगळं सांगितलं

Narendra Jadhav On RSS :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.

Narendra Jadhav On RSS :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात विरोधक सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारने त्रिभाषासंबंधित जीआर रद्द करत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. मात्र या समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्याने डॉ. नरेंद्र जाधव यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे.  आरएसएसशी (RSS) संबंधित असल्याने नरेंद्र जाधव (Narendra Jadhav) यांना या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असा देखील आरोप करण्यात येत आहे मात्र आता एका पॉडकास्टवर बोलताना नरेंद्र जाधव यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत विरोधकांवर टीका केली आहे.

या पॉडकास्टवर बोलताना डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, हिंदी सक्तीचा करणारा माशेलकरांचा अहवाल तेव्हाच्या सरकारने का? मान्य केला. तेव्हा राज्यात जागोजागी आंदोलने झाली पाहिजे होती मात्र झाली होती का? तेव्हा कुणी काय बोलत नव्हता मात्र आता का? बोलत आहे. निवडणुका जवळ आल्याने आता सर्वजण विरोध करत आहे. असं या पॉडकास्टमध्ये नरेंद्र जाधव म्हणाले.

पुढे बोलताना नरेंद्र जाधव म्हणाले की, माझ्या पन्नास वर्षांच्या करिअरमध्ये मी डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्यासोबत 35 वर्षे काम केलं आहे. जेव्हा ते राजकारणाच्या आजुबाजूला पण नव्हते केवळ आरबीआयचे (RBI) गव्हर्नर होते तेव्हापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केल आहे. मनमोहन सिंग जाहीरपणे बोलायचे सर्व वंचित समाजातील युवा-युवतींसाठी कोणी रोल मॉडेल असेल तर ते नरेंद्र जाधव आहेत. मग असा माणूस संघाचा माणूस असू शकतो का? असं नरेंद्र जाधव म्हणाले.

तसेच सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देखील मला पाच वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. सोनिया गांधी यांनी मला राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर नियुक्त केलं होतं. तेव्हा त्यांनी या पदावर कुठल्याही नेत्याला किंवा तथाकथिक विचारवंताला संधी दिली नाही. मला संधी दिली त्याचं काय कारण होतं? मी संघाचा आहे म्हणून? असा सवाल देखील या पॉडकास्टमध्ये डॉ. नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या विरोधकांना विचारला.

Video : मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; 9 जणाांचा मृत्यू

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यसभेवर असताना पाच वर्षे काम केलेलं आहे. डॉ. मोहन भागवत यांनी माझ्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलं त्यामुळे महाराष्ट्रात गदारोळ झाला असं देखील या पॉडकास्टमध्ये बोलताना नरेंद्र जाधव म्हणाले.

follow us