Download App

तेलही गेलंय, तुपही गेलंय अन् दुपट्टा आलायं, नरेश म्हस्केंची थेट ठाकरेंवर खरमरीत टीका

तेलही गेलं, तुपही गेलं अन् हाती दुपट्टा आला, अशी उद्धव ठाकरेंची परिस्थिती झाली असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलीय. तसेच राज्यात आगामी काळात राजकीय भूकंप होणार असून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेतला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. दरम्यान, मागील काही दिवसांत महाविकास आघाडीमध्ये धूसफुस सुरु असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर म्हस्केंनी दावा केलायं.

आपण नेमकं लोकशाहीत राहत आहोत का?; बारसू रिफायनरीवरुन आव्हाडांचा संताप

म्हस्के म्हणाले, सध्या राज्याच्या राजकारणात ज्या चर्चा सुरु आहेत त्या कथोकल्पित आहेत. पण राज्यात भूकंप होणार आहे हे नक्कीच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील लोकं मोठ्या संख्येने शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा देणार असल्याचंही भाकीत त्यांनी केलंय.

मुख्यमंत्री विसर्जित होणार, हे नक्की; आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार, सामनातून टोलेबाजी

तसेच राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचं कळताच उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन आम्ही मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेत असल्याचं सांगितलं आहे. तुम्ही कोणालाही मुख्यमंत्री करा, असंही ते म्हणाले आहेत. ही शोकांतिक असून ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व सोडलंय आता मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही गेलीय. पक्षही संपला आहे.

विखेंना राऊत-पवारांचा प्रश्न विचारताच सुशीलकुमार शिंदेंचा काढता पाय

राज्यात शिवसेनेचा जो ठसा होता आता संपला आहे. त्यामुळे आता तेलही गेलं तुपही गेलं अन् हाती धुपट्टा आला असल्याची टीका त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर केलीय. तसेच आमचे मुख्यमंत्री एका जागेवर बसणारे नाहीत. रात्रं-दिवस सर्वसामान्य लोकांसाठी, महाराष्ट्रातील प्रश्नांची उकल काढण्यासाठी झटणारे मुख्यमंत्री असल्याचंही प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांनी दिलंय.

मुख्यमंत्र्यांवर काहीतरी टीका करायची म्हणून विरोधक टीका करत आहेत. एक दिवस मुख्यमंत्री गावी गेले असतील आणि तिथून पण काम करत असतील आणि म्हणून संजय राऊत टीका करत असतील. तर गेल्या अडीच वर्ष जे आधीचे मुख्यमंत्री होते ते नॉट रिचेबल होते. त्यावेळी संजय राऊत यांची वाचा कुठे गेली होती? असा खोचक सवालही त्यांनी राऊतांना केला आहे.

Tags

follow us