विखेंना राऊत-पवारांचा प्रश्न विचारताच सुशीलकुमार शिंदेंचा काढता पाय

विखेंना राऊत-पवारांचा प्रश्न विचारताच सुशीलकुमार शिंदेंचा काढता पाय

Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : सोलापूर (Solapur)जिल्ह्यातील कुंभारी (Kumbahari)येथील मेडीकल कॉलेजच्या (Medical College) परिसरात सुरु होत असलेल्या श्रीमती कमलाबेन पटेल नर्सिंग इन्स्टिट्यूटचं (Smt Kamlaben Patel Nursing Institute)उद्घाटन सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde)आणि राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राधाकृष्ण विखेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. मात्र यावेळी पत्रकारांनी विखेंना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवर (Ajit Pawar) प्रश्न विचारल्यावर त्यावेळी बाजूला उभे असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी गर्दीतून वाट काढत बाजूला निघून गेल्याचे पाहायला मिळाले.

धक्कादायक! फ्लाइटमध्ये पुन्हा प्रवाशाने केली लघुशंका, गुन्हा दाखल

यावेळी पत्रकारांनी राधाकृष्ण विखे पाटलांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न केला त्यावर पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, मला वाटतं संजय राऊत हे कोणाची भाषा बोलतात? हा खरा प्रश्न आहे.

संजय राऊत हे स्वतःच बोलतात की, कोणाचा सल्ला घेऊन ते बोलतात? हे खरा प्रश्न आहे. त्याचा शोध घेण्याची गरज आहे. त्याचवेळी पत्रकारांनी विखे पाटलांना विचारले की, संजय राऊत असंही म्हणतात की, वीस दिवसांत राज्यातील सरकार पडणार आहे. त्यावर विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे.

ते मागील चार महिण्यांपासून सांगतात की, सरकार कोसळणार आहे. राज्यातील सरकार जाणार, त्याच्यात नवीन काहीच नाही, असा टोलाही यावेळी राधाकृष्ण विखेंनी लगावला आहे. विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या वाढत चालली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube