आधी फडणवीसांनी डिवचलं मग केसीआर यांनी खुलं आव्हानच दिलं…

आधी फडणवीसांनी डिवचलं मग केसीआर यांनी खुलं आव्हानच दिलं…

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेवरुन केसीआर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. तुम्ही महाराष्ट्रात का येताय, तेलंगनाचं सांभाळा, असं म्हणत फडणवीसांनी केसीआर यांना टोला लगावला आहे. त्यावर मी महाराष्ट्रातून जाईन पण तुम्ही दोन गोष्टी करा तरच, असं खुलं आव्हानंच केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.

मोदींना जेवढ्या शिव्या देतायत तेवढे ते प्रसिद्ध होतायत; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

केसीआर म्हणाले, शेतकऱ्यांना तेलंगाना जे देतंय ते द्या मी मध्य प्रदेशला जातो. करा तुम्हीच राज्य. महाराष्ट्रात पैशांची कमी नाही, मनाची कमी असल्याचं केसीआर फडणवीसांना म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत केसीआर यांनी महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर भाष्य केलं आहे. यामध्ये विशेषत: पाणी, शेतकरी या मुद्द्यांवर ते बोलले आहेत.

अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा

आम्ही तेलंगानात तलाठी व्यवस्थाच बंद केली. शेकऱ्यांना एकरी १० हजार देतो, ते अधिकाऱ्यांमार्फत नाही. थेट देतो. शेतकऱ्यांचा विमा मृत्यू झाल्याच्या आठ दिवसांच्या आत घरी जाऊन पाच लाख रुपये दिले जातात. शेतकऱ्यांचे धान्य आम्ही तिथे जाऊन खरेदी करतो. त्याचा पैसाही थेट खात्यात जातो, या प्रक्रियेमध्ये कोणी दलाल नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

आमदार लंकेंनी आता मनावर घेतलयं.. थेट विखेंच्या मतदारसंघातच घुसले…

केसीआर यांनी पाणीप्रश्नावरही भाष्य करीत सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले,देशात पाणी वापरात आले पाहिजे तर चांगले बंधारे बांधले गेले पाहिजेत. झिम्बाब्बेमध्ये पाणी साठवले जाते. तिथल्यासारखे देशात तीन चार धरणे असायला हवीत. परंतू केले जात नाहीय. नवीन रचना, नवीन कायदे आणले नाहीत तर हे होणार नाहीत. पाण्याला समजण्यासाठी आपला देशा आजही मागे आहे. माणूस पाण्याला बनवू शकत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक बिग बी यांची मोठी फसवणूक? ट्वीट करत म्हणाले…

केसीआर यांच्या आव्हानावर अद्याप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपली भूमिका मांडली नाही. मात्र, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगणार असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. संभाजीनगरमध्ये केसीआर यांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरु होती. संभाजीनगर शहर यावेळी गुलाबीमय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा डाव किती यशस्वी होणार? हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube