Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक बिग बी यांची मोठी फसवणूक? ट्वीट करत म्हणाले…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T102942.232

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या जोरदार चर्चेत आहेत. बिग बी यांच्या एका ट्वीटने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी बिग बी यांना फसवले असल्याचे चाहते म्हणत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
मागील काही दिवसांअगोदर एलन मस्क (Elon Musk) यांनी ब्लू टिक मोफत मिळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर २० एप्रिलपासून सर्वांचे ब्लू टिक काढण्यात आले होते. यामध्ये सिनेमासृष्टीतील अनेक सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांचा सर्वांचाच समावेश होता. आता यासंदर्भात बिग बी यांनी एक ट्वीट केले आहे.

बिग बी यांचा गंभीर आरोप

बिग बी यांनी ट्वीट करत सांगितले आहे की, ज्यांचे ट्विटरवर १ मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांना मोफत ब्लू टिक मिळाले आहे. माझे तर ४८.४ मिलिअन फॉलोअर्स आहेत. तरीदेखील मला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागले आहे. अशाप्रकारे बिग बी यांनी पैसे घेऊन ब्लू टिक दिल्याचा आरोप केले आहेत.

बिग बी यांचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या ट्वीटवर तुमचे पैसे तुम्हाला आता परत मिळणार नाही, एलन मस्क यांनी तुम्हाला फसवले असल्याची कमेंट्स सध्या एका चाहत्यांनी केला आहेत. ट्विटरने २० एप्रिलपासून मोफत ब्लू टिक हवे असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत, असं जाहीर करण्यात आले होते.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

तसेच ज्यांनी पैसे भरले त्यांना ब्लू टिक मिळाले तर ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांचे ब्लू टिक जाणार आहेत. ज्यांची १ मिलिअन फॉलोअर्स आहेत, ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या नावासमोरील देखील ब्लू टिक तसेच राहणार आहे. बिग बींनी ही बाब चाहत्यांच्या लक्षात आणून दिली आहे.

Tags

follow us