अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा

अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा

Sushilkumar Shinde : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव आज़ाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाम नबी आझाद हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. असं विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात केले आहे. ‘पण ते एवढ सोप्प नसत’ अशी कोपरखळी शिंदेंनी मारताच सभागृहात हशा पिकला.

सोलापुरातील कुंभारीत आज अश्विनी नर्सिंग कॉलेजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवगेळे किस्से सांगितले. तसेच त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा एक किस्सा सांगितला.

YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी… थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांनी मी काँग्रेसचा असताना ही मला युनायटेड नेशन मध्ये पाठवलं होत. भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना मी तिथं जाऊन काँग्रेसची बाजू मांडली नाही. तर देशाची बाजू मांडली, म्हणून परत आल्यानंतर वाजपेयीनीं माझा सत्कार ही केला, असं शिंदे म्हणाले.

प्रार्थना बेहेरेच्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या माणसाला युनायटेड नेशनमध्ये पाठवणं कठीण होत. मात्र अटलजी अशा गमती करायचे. अटलजी हा खरा रसिक आणि साहित्यिक माणूस होता, त्यामुळे राजकारणातील भांडण ही तूर्तातूर्ता असतात, त्याची तजवीज झाली की सगळं संपत. कोर्टात ‘तूर्तातूर्ता तजवीज’ असा शब्द आहे. मी कोर्टातही कामाला होतो , त्यामुळे मला ते चांगल माहिती आहे. असं ही यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

गुलाब नबी आझाद यांच्याकडून मोदींची स्तुती
काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. मोदी उदारमतवादी आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना अनेकदा विरोध केला पण त्यांच्यात कधीच सूडाची भावना नव्हती. ते नेहमी राजकारण्यासारखे वागायचे. त्यांनी जे काही केले त्याचे श्रेय मोदींना दिलेच पाहिजे. मग ते कलम 370 असो किंवा CAA किंवा हिजाब असो. अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केलेले वक्तव्य हे महत्वाचे मानले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube