Nashik News: नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना घडली अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत घडली आहे. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पत्नीच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. प्रभाकर हरी पवार (रा.सावतानगर,सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पत्नीसह सासरच्या लोकांनी जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंबड पोलीस ठाण्यात सुगंधा पवार, हरी काळू देवरे, रत्ना हरी देवरे, संध्या मनोहर मांडवळे आणि मोना गणेश जेऊघाले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. पत्नी आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून माझा मानसिक छळ करत आहे असा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
महिला, मुली सुरक्षित आहेत का? बदलापूर घटनेवरून रूपवतेंचा सरकारवर निशाणा
पवार कुटुंबीय बाहेरगावी असताना संशयित सून सुगंधा, तिचे आई-वडील, बहीण व बहिणीची पुणेस्थीत मैत्रीण आदींनी मृत मुलगा हेमंत प्रभाकर पवार यास मानसिक आणि आर्थिक त्रास दिला. या त्रासास वैतागून मुलगा हेमंत पवार याने गेल्या बुधवारी (14 ऑगस्ट) रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादी प्रभाकर हरी पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
पारनेरची जागा राष्ट्रवादी की शिवसेनेला…अंधारेंनी मंचावरूनच सांगून टाकल