Download App

निसर्गाचा मूड बदलला, अहमदनगरमध्ये गारपीटीचा तडाखा

अहमदनगर : आजच्या शिमग्याच्या दिवशीच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागांत सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. गारपीटीनंतर तालुक्यातील शेतशिवारासह रस्ते बर्फाच्छादित झाले आहेत.

तालुक्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेलं पिक गारपीटीमुळे आडवे झाले आहे.

अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपीटीने सोंगणीला आलेल्या पिकांचे नूकसान झालंय. यामध्ये शेतकऱ्यांच्या गहू, कांदा, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झालं आहे.

Naresh Mhaske : ताब्यात घेतलेली शाखा प्रतापराव सरनाईकांनी बांधली, ठाकरे गटाचा संबंध तरी काय?

ऐन सणाच्या दिवशीच झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास प्रचंड वारा सुटला होता, तसेच अचानक ढगाळ वातावरम झालं.

चीन मोबाईलद्वारे करतोय जासूसी? गुप्तचर यंत्रणांचा सैनिकांना इशारा

पारनेरसह अहमदनगरमधील काही भागांत गारवा निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला अवकाळी पावसाच्या हलक्या सुरु झाल्या. त्यानंतर अचानक गारपीट सुरु झाली.

जीभ हासडण्याची भाषा कराल तर… शंभुराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

दरम्यान, अचानक झालेल्या अवकाळी पावसाने अद्याप शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याची चर्चा असून शेतकऱ्यांच्या नूकसानीचा अंदाज अद्याप लागलेला नाही.

Tags

follow us