जीभ हासडण्याची भाषा कराल तर… शंभुराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे या दोन्ही गटातील नेते मंडळी एकमेकांवर शाब्दिक टीका करत आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई चांगलेच आक्रमक झाले आहे. जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा स्पष्ट इशारा शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जावुन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली असल्याचे देखील देसाई म्हंटले आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेचं आम्ही निषेध करतो असं शंभुराज देसाई म्हणाले. उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त पुढचं आम्हाला बोलता येतं. आमच्या नेत्यांनी संयम सोडायचा नाही असं आम्हाला सांगितल आहे, त्यामुळे आम्ही गप्प आहोत.
‘इम्तियाज जलील निजामाची औलाद’, शिंदे गटाच्या आमदाराची टीका
ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता त्यांचे तुम्ही चिरंजीव असून तुम्हाला ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिल जाईल असा इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
ठाण्यात पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट भिडले; जाणून घ्या वादाचे कारण
दरम्यान नुकतेच रत्नागिरीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला केला होता. यावेळी बंडखोर, गद्दार अशा शब्दात ठाकरे यांनी भर सभेत एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना खडेबोल सुनावले होते.