Download App

मोदींच्या प्रचारावरुन मिटकरींनी अजितदादांना पाडलं तोंडावर; म्हणाले, ते त्यांचं वैयक्तिक मत

Amol Mitakari On BJP and NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपच्या व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची गोची झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या अगोदर एकमेकांवर जोरदार टीका केली होती. परंतु आता नेते एकत्र आल्यावर मात्र, या कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येते आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अजित पवार समर्थक अमोल मिटकरी यांनी मुंबई तक या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना तुम्ही मोदींचा प्रचार करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या युतीमध्ये मीठाचा खडा टाकणारे उत्तर दिले आहे.

मिटकरी म्हणाले की,  मी भाजपचा प्रचारक नाही, भाजपचा प्रचार करणार नाही आणि भाजप व आरएसएसची विचारधारा मी मरेपर्यंत स्वीकारणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे जे 90 उमेदवार असणार आहे, त्यांची मी प्रचार करणार आहे. बाकीच्या उमेदवारांचा प्रचार करणं हे मला बंधनकारक नाही, असे म्हणत एकप्रकारे आपण भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महसूल खातं जाणार का? विखे पाटील म्हणाले, मला वाटतं…

तसेच 5 जुलैच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी 2024 साली नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असे म्हटले होते. यावर मिटकरींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवणं हे अजितदादा पवार यांचं वैयक्तिक मत आहे. माझं ते वैयक्तिक मत नाही, असे म्हणत आपले हात झटकले आहे. यावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच एकमत नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे अजित पवार हे मोदींचे कौतुक करताना दिसत असून त्यांचे प्रवक्ते मात्र, ते वैयक्तिक मत असल्याचे सांगत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी कनेक्शन; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, यावरुन अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये भाजपसोबत गेल्याने काय अडचण झाली आहे, ते समोर आल्याचे दिसते आहे. यावेळी मिटकरींना त्यांची एक जुनी व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली त्यामध्ये मिटकरींनी कविता करत भाजपवर निशाणा साधला होता. हा व्हिडीओ पाहताना मिटकरींना हसू आवरले नाही.

Tags

follow us