Download App

ठाकरेंचा परदेश दौरा अन् पवार पोहोचले शिंदेच्या घरी; काय झाली चर्चा, वाचा सविस्तर

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Meet Eknath Shinde :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली आहे. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पवार हे वर्षा बंगल्यावरून निघून गेले आहेत.

शरद पवार यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आत्ताची ही भेट का महत्वाची आहे त्याविषयी अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. त्यातील एक म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवरुन सुरु असलेली धुसफूस हे त्यातील एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. या सोबतच शिवसेनेच्या नेत्यांची भाजप बरोबर असलेली कुरबूर हे एक त्याचे तील कारण असू शकते. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपसोबत सापत्न वागणून मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे देखील या भेटीकडे महत्वाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे स्थळ ठरले, ‘या’ ठिकाणी होणार सभा

तसेच राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याने शिवसेनेचे नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. पण अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे सध्या देशाच्या बाहेर आहेत आणि अशा परिस्थितीत पवारांनी ही भेट घेणं या विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रवादीतूनचं शड्डू पडल्यानंतर कोल्हेंच्या लांडेंना शुभेच्छा; म्हणाले, शर्यत अजून….

याबरोबरच आत्तापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीही शरद पवारांवर टीका केलेली नाही. तसेच शरद पवारांनीदेखील एकनाथ शिंदेवर कधीही टीका केलेली नाही.  त्यामुळे या दोघांमधील संवाद चांगला असल्याचे बोलले जात आहे. तसेच एकनात शिंदेंचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली या लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री लक्ष घालत आहे. यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरु असलेल्या ईडीच्या चौकशा व त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली अस्वस्थता या सर्व बाबींचे कंगोरे या भेटीत असू शकतात.

दरम्यान, शरद पवार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली आहे. ही राजकीय भेट नव्हती. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत.त्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. कोणतेही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us