राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे स्थळ ठरले, ‘या’ ठिकाणी होणार सभा

Untitled Design   2023 06 01T200259.981

Nationalist Congress Party Foundation Day : राज्यात आगामी काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनाचे स्थळ आता निश्चित झाले आहे. हा सोहळा नगरजवळील केडगाव येथील रेल्वे ब्रिज जवळील मोकळ्या मैदानात पार पडणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) वर्धापन दिन हा अहमदनगर जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कार्यक्रम सोहळ्यासाठी अहमदनगरचीच निवड का केली असावीत याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजकीय दृष्या महत्वाचा मानला जात असलेल्या नगर जिल्ह्यात सत्ताधारी भाजपने वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून लक्ष घातले आहे. यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही नगरमध्ये ताकद लावण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त एक मेळावा 9 जून रोजी नगरमध्ये होणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

मोठी बातमी : विठू नामाचा गजर गगनात निनादणार; चोख नियोजनाबरोबर टोल माफीचे निर्देश

9 जून रोजी सायंकाळी हा विभागीय मेळावा होणार आहे. याचे नियोजन सध्या सुरू आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर दौरा केला होता. त्यांनी सभास्थळाची पाहणी देखील केली होती. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी होते.

Ahmednagar : नामांतराच्या घोषणेने निघाली जिल्हा विभाजनाच्या जखमेची खपली; दोन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण…

पक्षाचा 24 वा वर्धापनदिन
यंदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापनदिन अहमदनगरमध्ये साजरा होणार आहे. पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली होती. यावर्षीचा वर्धापनदिन मेळावा हा अहमदनगरमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथे पक्षाची परिस्थितीत चांगली आहे. लोकसभेची जागा गमावली असली तरी विधानसभेत पक्षाची स्थिती चांगली आहे.

Tags

follow us