NCP Jitendra Awhad Criticize Ajit Pawar : बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा संबंध मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणासोबत लावला जातोय. वाल्मिक कराडने (Walmik Karad Surrender) पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर केलंय. परंतु यावेळी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून सीआयडी ऑफिसला आला, त्या गाडीची चर्चा जास्त होत आहे. ही गाडी अजित पवारांच्या ताफ्यात असल्याचा दावा, खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय. यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
ज्या गाडीतून वाल्मिक कराड ‘CID’ कार्यालयात गेली ती गाडी अजित पवारांच्या… आव्हांडांचा मोठा दावा
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या X अकाउंटवर एक पोस्ट केलीय. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे (Beed) खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी उघड केलंय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल.
ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 2, 2025
अजितदादा पवार (Ajit Pawar) हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत (Beed Crime) गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे असून तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, यापेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, “आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई, पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने आमच्या मागे लागले आहेत.” वा रे वाह ! आधुनिक महाराष्ट्र, असं आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बरेच दिवस उलटून गेलेत. परंतु याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनप्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे. काही दिवसांपूर्वीच कराड पोलिसांना शरण आलाय. मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी संपूर्ण राज्यातून केली जातेय.
नवीन वर्षात प्रथमेशच्या सिनेमांचा धमाका! ‘टाईमपास’मधील दगडूला 11 वर्षे पूर्ण
जितेंद्र आव्हाड यांनी याआधी देखील एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये वाल्मिक कराडवर संशय व्यक्त करत धक्कादायक आरोप आव्हाड यांनी केला होता. वाल्मिक कराडला केजला कधी नेणार, हे देखील लोकांना माहित होतं. त्यामुळेच पुणे आणि केजमध्ये अराजकता पसरवण्यासाठी हजारो लोकं तयार ठेवली होती, असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये केला होता.