Ajit Pawar at Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादांच्या जे पोटात असतं तेच ओठात असतं, असं कायम म्हटलं जातं. अनेकदा ते अधिकाऱ्यांना देखील जाताना झाडतात, कामात दिरंगाई झाली तर ते अधिकाऱ्यांना देखील बोलतात. तसेच अनेकदा जाहीर भाषणात देखील ते मनमोकळेपणाने बोलत असतात.
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बारामती येथे का कार्यक्रमात बोलत असताना असाच एक प्रसंग घडला आहे. अजित पवार हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे बोलत होते. यावेळी एका कार्यकर्त्यांनी बारामती येथील भटक्या जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीची चिट्ठी अजितदादांकडे दिली.
मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान
यावर अजितदादांनी नेहमीप्रमाणे आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले आहे. आता मी साहेबांना विचारतो तुम्ही जनावरांचा बघता की कुत्र्यांचा बघता. साहेब जर म्हणाले मी जनावरांचा पाहतो तर मग मी कुत्र्यांचं पाहतो, अन सुप्रियाला म्हणतो राहिलेलं तू बघ, असे म्हणत अजितदादांनी मिश्किल शैलीत याला उत्तर दिले आहे.
यानंतर उपस्थित सभागृहामध्ये एकच अशा पिकला. या मोकाट जनावरांच्या संदर्भात कोंडवाडा करण्याच्या सूचना अजितदादांनी अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिल्या. तसेच जनावरांसाठी कोंडवाडा व भटक्या कुत्र्यांची नसबंदी करू असेही अजित दादा म्हणाले, नाहीतर भाद्रपद आला की सगळा धिंगाणा चालतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
Sanjay Shirsat : वज्रमुठ सभेत अजित पवार फक्त शरीराने, त्यांच्या मनात काय ते 2-3 दिवसांत कळेल
तसेच आत्तापर्यंत एकतर्फी तुम्ही मला साथ दिली आहे. तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही, हा शब्द मी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देतो, असे अजितदादा म्हणाले आहेत.