Download App

जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर मोठा निर्णय

Jitendra Awhad Resign :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार यांना एकटा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते नेहमी म्हणेत आलेत की नेत्यांनी लोकांचा विचार करुन चालले पाहिजे. त्यामुळे आमची ईच्छा आहे की त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. त्यांच्या लेखी आमचे काहीही महत्व नाही का, असे म्हणत आव्हाडांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मी मानसशास्त्रज्ञ नाही, पण पवार साहेब यांचे आजारपणाचे कारण चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहेत.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

जितेंद्र आव्हडांसह ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हा कार्यकारणीने आपले राजीनामे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. पक्षामध्ये अनेक पदं आहेत. त्या सर्व जागेवर नवीन लोकांना संधी देण्यात यावी. पण पवारांनी आपल्या पदावरच रहावे, असे आव्हाड म्हणाले आहेत. सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलेच पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये; नाना पटोलेंचा हल्लाबोल

आज कोणाचाही विचार न करता त्यांनी राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार! शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक चळवळीतील भीष्म पितामह आहेत. त्यांच्यातील ऊर्जा आम्हास बळ देत आहे. माझा राजकीय प्रवास शरद पवार या नावाने चालू आहे. आमचे सर्वांचे जीवन पवारांशी जोडले गेलेले आहे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. या  सगळ्यांचे राजीनामे नामंजूर केल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच आता कोणीही आपला राजीनामा देऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे. यानंतरही आता जितेंद्र आव्हाड व ठाण्यातील जिल्हा कार्यकारणीने आपला राजीनामा दिला आहे.

 

 

 

Tags

follow us