मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करतानाची ऑडिओ क्पिप व्हायरल झाली आहे. यामध्ये कोश्यारींसारखा चांगला माणूस महाराष्ट्राचा राज्यपाल झाला आहे, या शब्दांत पटेल यांनी कोश्यारींचं कौतुक केल्याचं दिसून येतंय. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये पटेल म्हणतात, भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आम्ही नशीबवान आहोत. आम्ही संसदेत असताना दोघांनी सोबत काम केल्याचं त्यांनी म्हंटलंय. तसेच आमचं सौभाग्य आहे, एक चांगला माणूस आमचा राज्यपाल आहे, या शब्दांत पटेल कोश्यारी यांचं कौतुक करत आहेत.
महसूल मंत्री विखे पाटलांनी आज कोणालाचं नाही सोडलं…
तसेच पुढे बोलताना पटेल म्हणतात, राज्यपाल इतके सरळ आणि चांगले व्यक्ती आहेत, पण काही लोकं त्यांच्याविषयी चुकीचं बोलत आहेत. विशेषत: माध्यमांमध्ये त्यांच्याविषयी चुकीचं बोललं जातंय. पण राज्यपालांकडे सेवाभाव असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Satyajeet Tambe : माझ्या ‘त्या’ ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही>
राज्यपाल पदावर असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून वारंवार महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते.
Shivaji Maharaj Statue Stolen found : छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा अखेर सापडला
विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांकडून राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर स्वत: राज्यपाल कोश्यारींनी मला पदमुक्त होण्याबाबत पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.
अखेर राष्ट्रपतींकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संपूर्ण घडामोडीनंतर ज्या पक्षांकडून राज्यपालांविरोधात निदर्शने, आंदोलने करण्यात येत होते. त्याच पक्षातील नेत्याकडून कोश्यारींचं कौतुक होतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.