Shivaji Maharaj Statue Stolen found : छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा अखेर सापडला

Shivaji Maharaj Statue Stolen found : छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा अखेर सापडला

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा ७ फेब्रुवारीला चोरीस गेला होता. अखेर एक आठवड्यानंतर हा पुतळा येथील एका भंगाराच्या गोदामात पोलिसांना आढळून आला आहे. बेकायदेशीर कृत्यांसाठी या भंगाराच्या गोदामाचा वापर करण्यात येतो, अशी माहिती मर्क्युरी न्यूज या वृत्तपत्राने दिली आहे. या पुतळ्याबद्दल पोलिसांना खबऱ्यांकरवी माहिती मिळाली होती. तसेच या गोदामातील कामगारांची चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आल्याने हा पुतळा भेट देण्यात आला होता. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. अमेरिकेतील शिवाजी महाराज्यांच्या एकमेव पुतळा होता. त्याची चोरी झाली असून पोलिस तपास करत होते.

‘मर्क्युरी’ न्यूज या वृत्तपत्राने ही माहिती दिली. मात्र, या पुतळय़ाची चोरी नेमकी कधी झाली, याबद्दल अद्याप अधिक माहिती मिळाली नाही. मात्र, हे गोदाम बेकायदेशीर कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. २०२१ सालचे कॅटलिस्ट कॉन्व्हर्टर चोरी प्रकरण, २०१० मधील एक दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा या प्रकरणात या भंगार गोदामाचे नाव पुढे आले होते. तसेच २००७ साली चोरीला गेलेले धातूचे साहित्य शोधण्यासाठी पोलिसांनी या गोदामामध्ये स्टिंग ऑपरेशन केले होते.

सॅन होजे पुणे सिस्टर सिटी ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष सुनील केळकर यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. पण घोड्याचे पाय कापल्यामुळे या पुतळ्याची पुनर्स्थापना कशी करायची, ही समस्या निर्माण झाली आहे. आमच्या भारतीय बांधवांसाठी या पुतळ्याचे भावनिक महत्व होते. तो त्यांच्या अस्मितेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया सान होसेचे महापौर मॅट महान यांनी दिली आहे.

संपूर्ण उत्तर अमेरिकेत शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्क (Guadalupe River Park) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. पुतळा कधी चोरीला गेला हे मात्र अद्याप कळालेले नाही. पुतळा चोरीला गेल्यादिवसापासून शोधमोहीम सुरु होती.

घोड्याचे खूर करवतीने कापून वरचा अश्वारूढ पुतळा चोरट्यांनी पळवला होता. २०० किलो वजनाचा हा पुतळा ९ फेब्रुवारी रोजी या भंगाराच्या गोदामात आढळून आला. कामगाराने दिलेल्या माहितीनुसार २९ जानेवारीला एक महिला आणि दोन पुरुष हा पुतळा घेऊन या गोदामात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube