NCP Leader Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी 5 मे ला बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले आहेत. एबीपी माझा वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शरद पवारांनी पुढे सांगितले की, मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय विचारुन घेतला असता तर स्वाभाविक मला विरोध झाला असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करुन घेतला. पण आपण 6 मेची बैठक 5 मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे ते म्हणाले आहेत.
अध्यक्षाची निवड ते जयंत पाटलांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर
दरम्यान, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या नेत्यांची नावे आहेत. या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती काल पवारांनी दिली आहे.