Download App

योद्धा मैदानात! पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतांनंतर महाराष्ट्र काढणार पिंजून

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. उद्या शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. तर 6 जुलैला राष्ट्रवादीची वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. (NCP Leader Sharad Pawar Will hold rally in all over Maharashtra form 8 July)

यानंतर 8 तारखेपासून शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात पवार उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातून करणार आहेत. 8 जुलैला पवार नाशिकमध्ये जाणार आहेत. तर 9 जुलैला धुळे आणि 10 जुलैला जळगावला जाणार आहेत.

पुण्यातील आमदार तुपे, टिंगरे नेमके कुणाबरोबर ? दोघांची राष्ट्रवादीच्या बैठकीला दांडी !

वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक :

दरम्यान, 6 जुलैला राष्ट्रवादीची दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही बैठक बोलावली आहे. पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता या बैठकीत आहे. वर्किंग कमिटीत कुणाचे बहुमत दिसणार? यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य ठरतं असतं.

नाशिकमध्ये भुजबळांना देणार पहिला धक्का :

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी कराडमध्ये जाऊन प्रितीसंगम येथे दिवंगत  माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादीत जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार आहे,  आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले होते.

राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची

त्यानुसार आता पवार यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. यात ते पहिला धक्का छगन भुजबळ यांना देणार आहेत. शरद पवार येत्या 8 जुलैला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत छगन भुजबळ यांनी अजित पवारांची साथ दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. याची झलकही आज पाहायला मिळाली.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने आले होते. नाशिक येथील कार्यालयावर छगन भुजबळ यांच्यागटाने ताबा घेतला आहे. अशात राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित बैठकीला अजित दादा गटाने विरोध केल्याने शरद पवार गटही आक्रमक झाला होता. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

Tags

follow us