राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची

राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची

NCP meeting : रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्रवादीवरही (NCP) दावा ठोकला. मात्र, आपला अजित पवारांना पाठिंबा नसल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. त्यामुळं राष्ट्रवादी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जातं. यासाठी पक्षाची बैठक बोलावली. राष्ट्रवादीच्या आमदारांना दोन्ही गटांकडून व्हीप जारी केला आहे. एक पक्ष आणि दोन व्हीप (Whip) असल्यानं आमदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. (Trouble with NCP MLAs ajit pawar group and sharad pawar group issue whips)

अजित पवारांनी शपथविधी झालयानंतर उद्या सकाळी अकरा वाजता वांद्रे येथे आमदारांची बैठक बोलावली असून, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी दुपारी एक वाजता वायबी सेंटरवर पक्षाची महत्वाची बैठक बोलावली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी, फ्रंटल सेल राज्प्रमुख, तालुकाध्यक्ष यांनी बैठकीला उपस्थित राहावं, अशा विनंतीचं NCP च्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं. तर नवनियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी आमदारांना व्हीप जारी केला आहे. आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व अन्य नेते राष्ट्रवादीचे नेते कोणत्या बैठकीला हजेरी लावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दोन व्हिप जारी झाल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांची सत्त्वपरीक्षा सुरू झाली आहे. शरद पवार की अजितदादा पवार, कोणाच्या पाठीशी उभे राहायचे असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे.

Eknath Shinde : तब्बल 51 वर्षानंतर दोनशे आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकमेव मुख्यमंत्री 

आव्हाड यांनी काढलेल्या पत्रकात दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या बैठकीला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे, असं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाडानंतर शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. विधानपरिषदेच्या एकून आमदारांपैकी पाच आमदार अजित पवार यांच्याकडे तर चार आमदार शरद पवार यांच्याकडे आहेत. अजित पवार यांच्यासोबत रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे, सतीश चव्हाण हे आमदार आहेत तर शरद पवार यांच्यासोबत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड, बाबा जानी दुराणी हे आमदार आहेत.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट –

महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर नेहमीच प्रेम केले आहे. आणि साहेबांचाही इथल्या जनतेवर जीव आहे. हे नाते अतूट आणि पहाडासारखं मजबूत आहे. सद्यस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षीय तरण योद्धा म्हणजेच आपले आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं.

दरम्या, शरद पवार यांनी स्वत: आमदारांना फोन करून उद्याच्या बैठकीला हजर राहण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळं आता आमदार कोणत्या पवारांच्या बैठकीला हजर राहतात, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube