Download App

‘अदृश्य शक्तीच्या जीवावर देशात खेळ चाललायं’; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule News : देशात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी थेट भाष्य केलं आहे. अदृश्य शक्तीच्या जीवावरच देशात खेळ चालला, असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. यासोबत देशात सुरु असलेली दडपशाही, खासदारांवर कारवाई, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; समृद्धी अन् शहजादा दिसणार मुख्य भूमिकेत

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर, पक्षात कोणी चुकीचा व्यवहार करीत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजलांवर कोणतीही केस नसताना आम्हाला न्यायालयाीन लढाई लढावी लागली आणि न्याय मिळाला. आम्ही आता ही पक्षासाठी न्याय मागत असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

Mahad MIDC Blast: रायगडच्या महाड MIDCतील कंपनीत भीषण स्फोट, अग्निकांडात 4 जणांचा मृत्यू

दिल्लीत एक अदृश्य शक्ती आहे. त्याचा उल्लेख अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. देशात आणि राज्यात फोडाफोडीचं राजकारण त्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चाललं आहे. अदृश्य् शक्ती उभी म्हणूनच हे सगळं चाललंय शक्ती नसते तरहा खेळ चालला नसता. महाराष्ट्रातील पक्षांचं खच्चीकरण करण्याचा कट कारस्थान सुरु आहे, हा अदृश्य शक्तीचा कट असल्याचा आरोपही सुळे यांनी यावेळी केला आहे.

Maratha Reservation : मराठा आणि कुणबी वेगवेगळे की एक? इतिहास संशोधक सावंत काय म्हणाले…

दरम्यान, देशात महागाई बेरोजगारी गंभीर समस्या आहे. कांदा निर्यातीवरील कर तातडीने बंद करा अशी माझी मागणी आहे. कांद्यासोबत इतरही वस्तूंबाबतची अवस्था सारखीच आहे. यासाठी मी केंद्रात आवाज उठवत आहे. दुध, तांदूळ, साखर सर्वच गोष्टीबाबत हीच अवस्था आहे, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला कोणताही हमीभाव दिलेला नसल्याचंही सुळे म्हणाल्या आहेत.

Reliance : नव्या इंटरनेट जगतात भारताची एन्ट्री! सॅटेलाइट आधारित इंटरनेट लाँच

आरक्षणावर राज्यात एक अन् दिल्लीत एक भाष्य :
मराठा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षाला यश मिळालं आहे. जरांगे पाटलांना ज्यांनी साथ दिली आहे. त्याचंही अभिनंदन. राज्य सरकार किती खोट बोलतं आणि रेटून बोलतं हे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. राज्य सरकार राज्यात एक आणि दिल्लीत एक बोलतं असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Tags

follow us