Reliance : नव्या इंटरनेट जगतात भारताची एन्ट्री! सॅटेलाइट आधारित इंटरनेट लाँच

Reliance : नव्या इंटरनेट जगतात भारताची एन्ट्री! सॅटेलाइट आधारित इंटरनेट लाँच

Reliance : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्सने (Reliance) पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा जिओ स्पेस फायबर लाँच केली आहे. देशात ज्या ठिकाणी इंटरनेट नाही अशा ठिकाणी इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील इंटरनेट क्षेत्रात हे मोठं पाऊल ठरणार आहे. देशात आज इंटरनेट आणि मोबाइलशिवाय काम करणे अशक्य आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकामी रिलायन्सचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

ही एक वायरलेस इंटरनेट सेवा आहे. ज्यामध्ये अंतराळात असलेल्या उपग्रहांचा वापर इंटरनेट सेवा देण्यासाठी केला जाणार आहे. रेडिओ लहरींचा वापर करून पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांशी संवाद स्थापित करते. डेटा ट्रान्समिशनसाठी एक खास संचार माध्यमाचा वापर केला जातो. सॅटेलाइट टीव्हीप्रमाणे यामध्ये नागरिकांना त्यांच्या घरात सॅटेलाइट डिश लााववी लागते. ही व्यवस्था आपल्याकडून वापरल्या जाणाऱ्या जमीन आधारित इंटरनेटपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तारा आणि फायबरच्या माध्यमातून डेटा ट्रान्समिशन केले जाते. सॅटेलाइट इंटरनेट प्रणालीत डेटा ट्रान्समिशनसाठी कोणत्याही वायर्सची गरज भासणार नाही.

खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक

सध्या या क्षेत्रात अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क याची मक्तेदारी आहे. मस्कच्या स्टारलिंक या कंपनीने काहीच वर्षात पाच हजारांपेक्षा जास्त सॅटेलाइट लाँच करून सगळ्यांनाच चकित केले. रणनीतीच्या दृष्टीनेही या सेवांचा वापर केला जात आहे. युक्रेन-रशिया युद्धात तेथील लोकांना स्टारलिंकनेच इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली होती. आता गाझातील लोकांसाठीही इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा मस्कने नुकतीच केली आहे. इस्त्रायलने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या क्षेत्रात एलन मस्कने आपला एकाधिकार स्थापित केला आहे. दुसरीकडे ट्विटरची मालकीही त्याच्याकडे आहे. ज्याचे दुष्परिणाम सध्या दिसू लागले आहेत.

एलन मस्कच्या मक्तेदारीला टक्कर

रिलायन्सने देशातील पहिली उपग्रह आधारीत इंटरनेट सेवा लाँच केली. ही सेवा देशात जिथे इंटरनेट नाही तिथे इंटरनेट देईल. या क्षेत्रात भारत कसा पुढे जात आहे हे कंपनीने दाखवून दिले आहे. जिओच्या या सेवेची तुलना मस्कच्या स्टारलिंकशी केली जात आहे. जिओ स्पेस फायबर आणि स्टारलिंक या दोन्ही उपग्रह आधारित इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु, दोन्ही कंपन्या वेगवेगळे उपग्रह वापरतात. जिओस्पेस फायबर LEO (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह वापरते. हा उपग्रह पृथ्वीपासून 160 ते 2 हजार किलोमीटर अंतरावर आहे. तर MEO उपग्रह दोन हजार ते बारा हजार किलोमीटर अंतरावर स्थापित आहे. यामुळे जिओची इंटरनेट सेवा स्टारलिंकपेक्षा स्वस्त राहिल. परंतु, स्टारलिंकचे सॅटेलाइट्स पृथ्वीच्या जवळ असल्याने इंटरनेट अधिक वेगवान असेल.

Bank Holidays in Nov 2023 : सणासुदीच्या काळात बँकांना भरमसाठ सुट्ट्या; एवढ्या दिवस बँका राहणार बंद…

देशाच्या सुरक्षेला धोका होणार कमी

भारतीय कंपन्यांच्या सेवांचा फायदा म्हणजे स्टारलिंकसारख्या परदेशी कंपन्यांच्या सेवांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार नाही. यावर काही प्रमाणात नियंत्रण असेल आणि देशविरोधी शक्तींना ही सेवा मिळू शकणार नाही. एक काळ असा होता की भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागासलेला होता. परंतु, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेक स्वदेशी कंपन्या या क्षेत्रात उतरल्याने देशातील तंत्रज्ञानाचा चेहराच बदलून गेला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube