Download App

सुप्रियाताई पहिल्याच दिवशी अ‍ॅक्टिव; कार्याध्यक्ष पदाचा चार्ज घेत लोकसभेसाठी खोचला पदर

NCP Supriya Sule :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यातील महिलांची सुरक्षा ते शिवसेनेची जाहिरात यावरुन त्यांनी सरकारला लक्ष केले. तसेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. याआधी त्यांचे मुंबईतील पक्षाचा कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले.

मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महिला सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गृहखात्यााची आहे.  राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहे. हे  सरकार महिलांबद्दल असंवेदनशील आहे, असे म्हणत महिलांच्या प्रश्नावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Radhakrishna Vikhe : ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी, त्यामागे जिल्हा विभाजनाचा विचार नाही’

तसेच  शिवसेनेच्या जाहिरातीवरुन त्यांनी चिमटा काढला आहे. असे जाहिरात देणारे  हितचिंतक आम्हीही शोधतोय. असे हितचिंतक तुम्हाला सापडले तर माझा आणि दादाचा नंबर द्या, असे पत्रकारांना म्हणत त्यांनी शिंदे गटाला मिश्किल टोला लगावला. सत्ताधारी फक्त आपापसातील संघर्षात व्यस्त आहेत. असंच सुरु राहिलं तर राज्य कसं चालणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

https://letsupp.com/maharashtra/ajti-speak-on-transfer-rates-from-communal-violence-57988.html

राज्यात एका-एका मंत्र्याकडे 10 ते 15 खाती आहेत. कॉर्पोरेशनच्या जागेवर नगरसेवक नाही आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूक घेतलेल्या नाहीत. एकच व्यक्ती जिल्हा आणि महापालिका चालवत आहे. त्यामुळे राज्य हुकूमशाहीकडे चालले आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

तसेच यावेळी त्यांनी आगामी काळातीन निवडणुकांविषयीदेखील भाष्य केले. होय, आम्ही लोकसभेची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील  काम म्हणजे टीमवर्क असल्याचे त्या म्हणाल्या.

 

Tags

follow us