Download App

आदिवासी नागरिकांवर केलेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध! रोहित पवार संतापले, भाजप अन् RSS चे आदेश…

Rohit Pawar Condemns Lathicharge On Tribal Citizens : ‘आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे, तरीही त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असते, ‘ असे विधान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी (Rohit Pawar) अकोले येथे भाषणात केले. काल अकोले (Akole) इथं निघालेल्या मिरवणुकीत ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशीच या सरकारने आदिवासींवर लाठीचार्ज केला. स्वतः आमदारांनीच याची कबुली दिली. आदिवासी नागरिकांवर केलेल्या या लाठीचार्जचा जाहीर (Lathicharge On Tribal Citizens) निषेध, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘वॉर 2’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू! ऋतिक आणि एनटीआरचा नवा अॅक्शन प्रोमो प्रदर्शित

सत्ताधाऱ्यांकडून आदिवासींना दुय्यम वागणूक

अजितदादांच्या आमदाराने काढलेल्या मिरवणुकीत गृहविभागाकडून लाठीचार्ज केला जातो, याचा अर्थ सरकारमधील तीन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आहेत, हेही यानिमित्ताने स्पष्ट होतं. पण कुरघोडीच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांकडून (Maharashtra Politics) आदिवासींना दुय्यम वागणूक मिळत असेल, तरी आम्ही मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ‘जागतिक आदिवासी दिन’ हा आदिवासींच्या स्वाभिमानाचा दिवस असतानाही भाजपाने तो साजरा केला नाही. ज्यांनी साजरा केला, त्यांच्यावर लाठीमार करुन भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं.

पोलिसांकडून लाठीचार्ज

काल आदिवासी मंत्री यांनी कुठेही आदिवासी समाजाला शुभेच्छा दिल्या नाहीत. याचे कारण म्हणजे भाजपने परवानगी दिली नव्हती. राजकीय पोळी भाजण्यासाठी विभागलं जातं आहे, तसे होऊ नये. अजित पवार यांचा आमदार कार्यक्रम घेतो. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आदिवासी हे नाव कसे आले, तर त्या भूमीवर जे लोक राहत आले ते आदिवासी. यावरून शब्दाचा खेळ केला जातो. ते म्हणजे आरएसएस आणि भाजपने यांना वनवासी नाव दिलं.

रशिया युक्रेन युद्धात ट्विस्ट! पुतिन यांचा प्रस्ताव ट्रम्पना मान्य पण, झेलेन्स्कीच्या ‘त्या’ घोषणेनं युद्ध भडकणार?

जमीन हिसकावण्याचे प्रयत्न सुरू

आदिवासी समाज त्या भागात राहतो जिथे डोंगर आहे, त्या जमिनीचे मालक हे आदिवासी आहेत. तुमचे जमीन हिसकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्या तरी मोठ्या उद्योपतीला देण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही नेते, कॉन्ट्रॅक्टर या आदिवासी लोकांना तिथून हाकलवत आहेत. नक्षलवादी म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील रोहित पवारांनी केलीय.

 

follow us