‘वॉर 2’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू! ऋतिक आणि एनटीआरचा नवा अॅक्शन प्रोमो प्रदर्शित

‘वॉर 2’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू! ऋतिक आणि एनटीआरचा नवा अॅक्शन प्रोमो प्रदर्शित

War 2 New Promo Released Hrithik And Vs NTR’s : अयान मुखर्जी दिग्दर्शित यश राज फिल्म्स ची वॉर 2 (War 2) ही 2025 मधील सर्वात प्रतिक्षित फिल्म आहे. या भव्य पॅन-इंडिया अॅक्शन स्पेक्टेकलच्या इंडिया अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. याची घोषणा ऋतिक रोशन आणि एनटीआर यांच्या सुपर-स्पाय अवतार कबीर आणि विक्रमला दाखवणारा जबरदस्त नवा अॅक्शन प्रोमो प्रदर्शित करून (Hrithik Vs NTR) केली.

रशिया युक्रेन युद्धात ट्विस्ट! पुतिन यांचा प्रस्ताव ट्रम्पना मान्य पण, झेलेन्स्कीच्या ‘त्या’ घोषणेनं युद्ध भडकणार?

आदित्य चोप्रा निर्मित वॉर 2 ही ख्यातनाम वायआरएफ स्पाय युनिव्हर्स फ्रँचायझीचा सहावा भाग आहे, ज्याने आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर्स दिल्या (Entertainment News) आहेत. वॉर 2 प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. अफाट स्केल आणि एक्शनसह एक तीव्र कथा, ज्यामध्ये ऋतिक आणि एनटीआर एकमेकांविरुद्ध भव्य आणि रक्तरंजित लढाईत आमनेसामने येणार (Bollywood) आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट, 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

ICICI बँकेत खातं उघडायचंय? मग, खात्यात 50 हजार ठेवा; बँकेचा अजब नियमाने वाद वाढला

यशराज फिल्म्स ने अखेर त्यांच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित सिनेमासाठी ‘वॉर 2’ मधील भव्य डान्स ट्रॅक ‘जनाब ए आली’ ची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. हा ट्रॅक म्हणजे हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्यातील एक अभूतपूर्व डान्स राइव्हलरी जिथे शैली, ऊर्जा आणि अभिनयाचा मिलाफ होणार आहे. गाण्याचे संगीतकार आहेत प्रीतम, गायक सचेत टंडन आणि साज भट्ट, आणि गीतलेखक अमिताभ भट्टाचार्य. हे गाणं एक हाय एनर्जी डान्स अँथम असून, प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण करत आहे.

आदित्य चोप्रा, जे गेल्या 30 वर्षांपासून भारतातील भव्य सिनेमे नव्या दृष्टीकोनातून मांडत आले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा ‘कजरा रे’ (बंटी और बबली) आणि ‘कमली’ (धूम 3) सारखी प्रमोशनल स्ट्रॅटेजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube