हृतिक VS एनटीआरचा थरार! ‘वॉर 2’ च्या ‘जनाब ए आली’ची झलक प्रदर्शित

हृतिक VS एनटीआरचा थरार! ‘वॉर 2’ च्या ‘जनाब ए आली’ची झलक प्रदर्शित

Janaab Ae Aali Song War 2 Song : यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) अखेर त्यांच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित सिनेमासाठी ‘वॉर 2’ मधील भव्य डान्स ट्रॅक ‘जनाब ए आली’ ची पहिली झलक प्रदर्शित केली आहे. हा ट्रॅक म्हणजे हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्यातील एक अभूतपूर्व डान्स राइव्हलरी – जिथे शैली, ऊर्जा आणि अभिनयाचा मिलाफ होणार आहे. गाण्याचे संगीतकार (War 2 Song) आहेत प्रीतम, गायक सचेत टंडन आणि साज भट्ट, आणि गीतलेखक अमिताभ भट्टाचार्य. हे गाणं एक हाय एनर्जी डान्स अँथम (Hrithik vs NTR) असून, प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण करत आहे.

केक कटींग अन् स्टेटस ठेवत झाली गायब; पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल

आदित्य चोप्रा, जे गेल्या 30 वर्षांपासून भारतातील भव्य सिनेमे नव्या दृष्टीकोनातून मांडत आले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा ‘कजरा रे’ (बंटी और बबली) आणि ‘कमली’ (धूम 3) सारखी प्रमोशनल स्ट्रॅटेजी वापरण्याचा निर्णय (Entertainment News) घेतला आहे. ‘जनाब ए आली’ हे गाणं पूर्णपणे ऑनलाईन रिलीज न करता केवळ चित्रपटगृहातच दाखवले जाईल, जेणेकरून प्रेक्षकांना हृतिक आणि एनटीआर यांना एकत्र डान्स करताना पाहण्याचा (Bollywood) जिवंत अनुभव मिळेल.

महाराष्ट्रात मतदार यादीत महा घोटाळा? निवडणूक आयोगावर बॉम्ब; राहुल गांधींनी दिला पुरावा

हीच स्ट्रॅटेजी यशराजने याआधी ‘कजरा रे’ आणि ‘धूम 3’ मध्ये वापरली होती. या गाण्यांनी थिएटरमध्येच धमाका केला होता. ‘वॉर 2’ चे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले असून, कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेत. ‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

गाण्याची क्रेडिट्स:

संगीत: प्रीतम
कोरिओग्राफी: बॉस्को लेस्ली मार्टिस

हिंदी आवृत्ती:
गायक: सचेत टंडन, साज भट्ट
गीतकार: अमिताभ भट्टाचार्य

तेलुगु आवृत्ती:

गायक: नकाश अज़ीज़, याजिन नज़ीर
गीतकार: कृष्णा कांत

तमिळ आवृत्ती:

गायक: नकाश अज़ीज़, याजिन नज़ीर
गीतकार: मधन कार्की

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube