NCP Political Crisis : शरद पवार यांना याआधी भाजपशी जवळीक साधण्यासाठी कधी संकोच वाटला नव्हता. पण आपल्या मुलीच्या सल्ल्यानेच ते सर्व कृती करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यावेळी त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केले आहे.
शरद पवार यांना यापूर्वी भाजपशी सलगी करण्यासाठी कधीही संकोच वाटला नव्हता. आपल्या मुलीचा सहाय्याने ते सर्व कृती करतात आणि आजपर्यंत त्यांनी आपला प्रत्येक निर्णय प्रत्येकावर लादला आहे, या तीन कारणांमुळे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे पटेल यांनी सांगितले.
जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतील अडसर? पवारांनी स्पष्टच सांगितलं
प्रफुल पटेल हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. परंतु त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांना तर ही पवारांचीच खेळी असल्याचे वाटत होते. पण आता यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे की अजित पवार व शरद पवार यांच्यात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे.
पटेल पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेत असाल तरच पक्ष समर्थक, पक्ष सदस्य आणि आमदारांची कामे होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस एकेकाळी काँग्रेस सोबत सत्तेत होता. त्यानंतर राष्ट्रवादीने शिवसेने सोबत देखील युती केली. परंतु वयाच्या 82 व्या वर्षी शरद पवार यांनी आपल्या मुलीच्या हितासाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या या कृतीमुळे खूप संभ्रम निर्माण झाला.
शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही; हे रंग बदलणारे सरडे; भुजबळांच्या टीकेवर आव्हाडांचा घणाघात
तसेच शरद पवार यांनी 2014 पासून किमान तीन वेळा भाजपसोबत सलगी केली होती. 2019 च्या निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेची युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते तत्त्वनिष्ठ विरोधी पक्ष म्हणून राहू शकले असते पण त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेची युती केली, असा आरोप पटेल यांनी केला आहे.