Download App

Video : ‘पवार बाबा की जय’; शरद पवारांना चिमुकल्याची साद!

NCP Sharad Pawar :  शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांची पहिलीच सभा नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात आहे. येवल्यामध्ये आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आज सकाळी शरद पवार नाशिकमध्ये झाले. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी त्यांची येवल्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर शरद पवार नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतील अडसर? पवारांनी स्पष्टच सांगितलं

पण या सगळ्या दरम्यान शरद पवारांचा एका व्हीडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत शरद पवारांनी एक आजींशी संवाद साधला असून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी आजींनी पवारांना म्हटले आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आज शरद पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यातील ताराबाई निघोट या आजींनी शरद पवार यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला आणि शरद पवार यांना लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान ताराबाई यांच्या नातवाने शरद पवार यांच्यासोबत बोलताना पवार बाबा की जय चा नारा लगावला.

आमचे सहकारी आता परत फिरणाऱ्या चिमण्या नाहीत; तणावातही पवारांची शाब्दिक कोटी

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवारांनी राज्यभर आपला दौरा सुरु केला आहे. आज त्यांची पहिली सभा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला येथे होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी आपण भुजबळांना ओळखण्यात चूक केली असल्याचेही पवार म्हणाले. नाशिक जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी अजित पवारांची साथ दिली आहे. त्यामुळे पवारांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून केल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us