Download App

सख्खा-चुलत भाऊ पक्क्या विरोधकासोबत! रोहित पवारांसमोरच पार्थ फराळाला ‘राम शिंदेंच्या’ घरी

अहमदनगर : राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते पार्थ पवार हे दोघे भाऊ पहिल्यांदाच राजकीय मैदानावर आमने – सामने भिडताना दिसणार आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज (16 नोव्हेंबर) आपल्या मतदारसंघातील चौंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभही होणार आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) देखील चौंडीत येणार आहे. रोहित पवारांचे राजकीय शत्रू असलेले आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला पार्थ हजेरी लावणार आहे. मात्र या माध्यमातून पवार कुटुंबाला एकमेकांच्या समोर उभे करत राम शिंदे यांनी मोठा राजकीय डाव खेळल्याचे बोलले जाते.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या विविध कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडणार आहे. तसेच यावेळी रोहित पवार यांची राज्यभर चर्चेत असलेली संघर्ष यात्रेचा शुभारंभ चौंडीतून होणार असून यासाठी कार्यकर्त्यांकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने आज चौंडीमध्ये ठिकठिकाणी रोहित पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहे. दरम्यान आज चौंडीमध्ये रोहित पवार यांची सभा देखील पार पडणार आहे. (NCP (Sharad Pawar group) MLA Rohit Pawar and NCP (Ajit Pawar group) leader Parth Pawar choundi on same day)

Dhangar Reservation : अल्टिमेटम संपला, आता माघार नाही! चौंडीत आजपासून उपोषणाचा ‘आवाज’

तसेच आजच पार्थ पवार देखील चौंडीत येणार असल्याने त्यांचे देखील बॅनर आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहे. दरम्यान, कार्यक्रमाचे निमित्त जरी दिवाळी फराळाचे असले तरी मात्र या निमिताने आगामी निवडणुकांची तयारी व मोठे शक्तिप्रदर्शन हे नेतेमंडळींकडून केले जात आहे. यातच ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे यांनी रोहित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. यामुळे मतदार संघात पुन्हा एकदा बळकटीकरणासाठी रोहित पवार हे देखील सरसावले आहे. दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राम शिंदे यांनी देखील आता शक्तिप्रदर्शनची तयारी केली आहे.

Karnataka Politics : देवेगौडांचा पक्ष भाजपात? सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने खळबळ!

चौंडीत आजपासून उपोषणाचा एल्गार :

राज्यात मराठा आरक्षणाचा मु्द्दा चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, असे म्हणत आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार धनगर समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. या मागणीसाठीच आता यशवंत सेनेच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुन्हा उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे. आता आरक्षणाची लढाई कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. चौंडीतील उपोषणानंतर सरकारकडून 50 दिवसांची मुदत मागितली होती. लेखी आश्वासनानंतर समाज बांधवांकडून उपोषण मागे घेण्यात आले होते मात्र दिलेली मुदत संपली तरी देखील कोणतेही पाऊले उचलले गेले नाही. आता पुन्हा एकदा चौंडीत आरक्षणाचा प्रश्न पेटणार असल्याचे दिसून येत आहे. आज संध्याकाळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

Tags

follow us