Download App

प्रशांत कोरटकरने पसार काळात कुणाची वाहन वापरली?, मदत करणाऱ्यांची नावंही आली समोर

कोरटकरच्या घराबाहेर पोलिसांचा गराडा असल्याने तो स्वतःच्या वाहनातून पसार झाला होता. पण, १८ मार्चला त्याचा अटकपूर्व

  • Written By: Last Updated:

Prashant Koratkar Case : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने करत प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित यांना फोन करून धमकावले. त्यामध्ये त्याला आता अटक करण्यात आलेली आहे. मात्र काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. फरार असल्याच्या काळात कोरटकरने दोन मोटारींचा वापर केला. (Prashant Koratkar) पसार काळात मदत करणाऱ्यांचीही नावं निष्पन्न करण्यात यश आल्याचं तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोरटकर याने २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दोन कॉल केल्याची तक्रार इतिहास संशोधक सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानप्रकरणी नागपूरमध्येही कोरटकरविरोधात गुन्हा दाखल झाला. हे दोन्ही गुन्हे कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या कोरटकरच्या वकिलांनी १ मार्चला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविल्याने नागपूरमध्ये गेलेले कोल्हापूर पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परतले होते.

कोरटकरला वाचवणारी यंत्रणा जनतेसमोर आणा अटकेनंतर, इंद्रजित सावंत यांची मोठी मागणी

कोरटकरच्या घराबाहेर पोलिसांचा गराडा असल्याने तो स्वतःच्या वाहनातून पसार झाला होता. पण, १८ मार्चला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केल्याने त्याने राज्यातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चंद्रपूरमध्ये वास्तव्याला असलेल्या कोरटकरने मित्राच्या वाहनाचा वापर करत हैदराबादकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही वाहनांची माहिती पोलीस तपासात उघड झाली.

पोलिसांना चकवा देण्यासाठी काही राजकीय व्यक्ती, पोलिसमित्रांनी त्याला मदत केल्याचा आरोप वारंवार होत आहे. कोल्हापूर पोलिसांनीही कोरटकरच्या सुरुवातीच्या कॉल डिटेल्ससह नातेवाईकांचे, मित्रांच्या मोबाईलचे सीडीआर मिळवून त्याआधारे मदत करणाऱ्यांची नावेही निष्पन्न करण्यास सुरुवात केली आहे. कोणी कोणत्या प्रकारची मदत केली यावरून पुढील कारवाई होणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

गांधीनगरमध्ये वैद्यकीय तपासणी

अटक काळात २४ तासांच्या अंतराने संशयिताची वैद्यकीय चाचणी करावी लागते. कोरटकरलाही आज वैद्यकीय तपासणीसाठी कोठडीतून बाहेर काढलं. सीपीआरमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरटकरची वैद्यकीय तपासणी गांधीनगर येथील ग्रामीण रुग्णालयात करून त्याला पुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत आणलं.

follow us