महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व शिबिरात मृतांचे सातबारे होणार जिवंत…

Chandrashekahar Bavankule on Chhatrapati Shivaji Maharaj Maha Revenue Camp : राज्यामध्ये महसूल विभागाचे तब्बल 1600 शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराज महा राजस्व शिबिर असे या शिबिराचं नाव असून यामध्ये जनतेच्या विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत. विविध महसुली कामांसाठी नागरिकांना सरकारकडे किंवा प्रशासनाकडे हेलपाटे घालावे लागू नये. यासाठी हे अभियान राबवले जात आहे.
यामध्ये एका वर्षामध्ये चार महसुली मंडळामध्ये ही शिबिर घेतली जातील. त्यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार हे जनतेच्या दारी जाणार आहेत. प्रत्येक गावामध्ये हे अभियान राबवले जाऊन सरकारकडून देण्यात येणारी विविध अनुदान देखील यामध्ये दिली. जातील त्याचबरोबर याच अंतर्गत आता तालुक्यामध्ये चार महसुली मंडळ असणार आहे. जे अगोदर एक होतं.
आदित्य ठाकरे स्वत: ड्रग्ज विकतो, नितेश राणेंचा खळबळजनक दावा
या शिबिरामध्ये सर्वात महत्त्वाची योजना राबवली जाणार आहे. ती म्हणजे जिवंत सातबारा या अंतर्गत मृत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना जमीन नावे करण्यासाठी ज्या खेट्या माराव्या लागत होत्या. त्या लागणार नाही. कारण पुढील तीन महिन्यात राज्यामधील सातबारामध्ये बदल केले जाणार आहेत. त्या अंतर्गत गावातील मृत खातेदारांच्या वारसांचे अधिकृत नोंदणी केली जाईल. राज्यभरात दीड महिन्यात सातबारावर असलेल्या मृत व्यक्तींची नावे कमी करून या ठिकाणी त्यांच्या वारसांची नोंद केली जाणार आहे.
कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिंदेंवरील टीकेचे पडसाद
ही योजना येत्या एक एप्रिल पासून सुरु होणार असून पुढील दीड महिना ही योजना सुरू असणार आहे. अशी घोषणा अगोदरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा यायचा उल्लेख केला. दरम्यान सातबारावर मृत खातेदारांच्या नावाची नोंद असल्यामुळे शेत जमिनीचे व्यवहार, कर्ज प्रकरण आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये संबंधित वृत्त शेतकऱ्याच्या वारसांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत सातबारा अद्यावत करण्यासाठी ही मोहीम सरकारने हाती घेतले आहे.