महाराज हिंदूंचे! ‘खालिद का शिवाजी’ बॅन करण्याची मागणी करत हिंदू संघटना आक्रमक

Chhatrapati Shivaji Maharaj belongs to Hindus Hindu organizations are aggressive, demanding a ban on ‘Khalid Ka Shivaji’ : मराठी चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ वर बंदी आणावी. अशी मागणी करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यासाठी या संघटनांनी सेन्सॉर बोर्डला पत्र पाठवले आहे. हा चित्रपट 8 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला आहे. असा आक्षेप घेण्यात आला आहे.
हिंदू संघटना आक्रमक…
मुंबईतील एका स्थानिक हिंदू संघटनेने 8 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील हिंदू महासंघ या संस्थेने चित्रपटाच्या निर्मात्यांना विरोधाचं पत्र लिहिलं आहे.
शिक्षकच बनला भक्षक! चौथीतल्या चिमुरडीवर अत्याचार; अहिल्यानगर हादरलं, आरोपी मोकाट…
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं की, या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर प्रशासक म्हणून दाखवण्यात आलं आहे. मात्र हे त्यांच्या खऱ्या इतिहासाच्या विरूद्ध आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी न आणल्यास आम्ही चित्रपटगृहाच्या बाहेर आंदोलनं करू.
एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी, तक्रारींचा पाढा की वादग्रस्त मंत्र्यांना दिलासा; पडद्यामागं काय शिजलं?
तसेच आनंद दवे यांनी पुण्यातील चित्रपटगृहांना देखील चित्रपट न दाखवण्याची मागणी केली आहे. तसेच हा चित्रपट ग्रामीण भागात दाखवल्यास तेथे जाऊन आम्ही महाराजांच्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करू. कारण चित्रपटातून इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे. महाराज हिंदू आणि मराठा समाजाचे आहे. त्यामुळे चित्रपटाचं शिर्षक देखील त्याविरूद्ध आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.